नेताजी सुभाष चौकात विनापरवाना बॅनर लावले

शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेताजी सुभाष चौकातील ईलेक्ट्रीक खंब्यावर विनापरवाना व बेकायदेशीररित्या बॅनर लावल्या समोर आले आहे. याप्रकरणी महापालिकेने कारवाई करत बॅनर हटविण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी २४ जानेवारी रोजी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेताजी सुभाष चौकातील एका इलेक्ट्रीक खांब्यावर जाहीरातीचे बॅनर विनापरवाना लावण्यात आले होते. जाहीरात लावण्यासंदर्भात महापालिकेकडून कोणतीही परवानगी काढण्यात आलेली नव्हती. या अनुषंगाने जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी १२. ३० वाजता धडक कारवाई करत शुभेच्छाा असलेले बॅनर हटविण्यात आले. महापालिकेचे लिपीक अजय बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता निलेश संजय बाविस्कर रा. भवानी पेठ, जळगाव आणि कमलेश प्रभाकर महाजन रा.नशिराबाद, जळगाव या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content