निवडणुकीतील विजयाचा राष्ट्रवादी कार्यालयात फटाके फोडून जल्लोष (व्हिडीओ)

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाचा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यालयात आज दुपारी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी पदाधिकार्‍यांनी फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवित आनंदोत्सवही साजरा केला.

राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडविला. या विजयाचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंदोत्सव तसेच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र भैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे- खेवलकर , जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार राजेश पाटील, संजय चव्हाण, अशोक लाडवंजारी, अजय बढे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, वाय.एस. महाजन, माजी नगरसेवक सुनील माळी, सलिम इनामदार, जयश्री पाटील यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नुकतीच महाविकास आघाडीच्या सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. या वर्षपूर्तीच्या शुभमुहूर्तावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले हा. जनेतचा विश्‍वास आहे. आमदारांचे अभिनंदन करतो तसेच हीच परिस्थिती आगामी 15 वर्ष कायम राहिल, असा विश्‍वास यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र भैय्या पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!