निलंबनाच्या निषेधार्थ भाजपकडून महाविकास आघाडीची अंत्ययात्रा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या भाजपच्या १२ आमदरांना निलंबीत केले. त्याच्या निषेधार्थ भाजप जिल्हा महागनरतर्फे आज सायंकाळी महाविकासर आघाडी सरकारची भाजप कार्यालयापासून ते टॉवर चौकापर्यंत अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिकवेशनात सत्ताधारी व विरोधाकांमध्ये जोरदार चकमक झाली. यात विरोधकांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना जाब विचारला. याातच काही काळ गोंधाळाचे वातावरण निर्माण झाल्याने विरोधकांनी धक्काबुक्की करीत शिवीगाळ केल्याचा आरोप तालिका अध्यक्षांनी केला. विधानसभेत झालेल्या गोंधाळावरुन तालिका अध्यक्षकांनी विरोधी पक्षातील १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबीत केले. या निलंबणासह महााविकास आघाडीच्या विरोधात भाजप महानगरतर्फे सोमवारी दुपारी भाजपच्या कार्यालयातून महाविकास आघाडीची प्रतिकात्मक पुतळा तयार करुन टॉवर चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.  यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, अरविंद देशमुख, किशोर चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!