जळगाव, प्रतिनिधी । निर्यातक्षम द्राक्षबागांची २०२०-२१ साठी ग्रेपनेट प्रणालीद्वारे नोंदणी सुरू झाली आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना नोंदणी बंधनकारक आहे. २०१९-२० मध्ये ३३ हजार ४५१ बागांची नोंदणी झाली होती. तीन दिवसांपासून सुरू झालेली नोंदणी २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की कीडनाशक उर्वरित अंश व कीडरोगांची हमी देण्यासाठी ग्रेपनेटद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी केली जाते. सूचनांनुसार आवश्यक अशलेल्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने द्राक्षांसाठी कायदेशीर प्रमाणित औषधांची यादी आणि द्राक्षांसाठी २०२०-२१ मध्ये वापरण्याच्या औषधांची यादी अंतिम करून ग्रेपनेट प्रणालीवर ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा द्राक्ष उत्पादकांनी नोंदणी, नूतनीकरणासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व कृषी तालुकाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ अर्ज करावेत. निर्यातक्षम द्राक्ष बागेच्या नूतनीकरणासाठी केवळ अर्ज करणे आवश्यक आहे