नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया प्रकरणातील चारही दोषींचे डेथ वॉरंट जारी झाले आहे. त्यानुसार या दोषींना २० तारखेला पहाटे साडेपाच वाजता फाशी दिली जाणार आहे. परंतू फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत रुपांतरित करावी, अशी विनंती दोषी विनय शर्मा याने दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे केली आहे.
सन २०१२ च्या निर्भया प्रकरणातील आरोपींचे कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रपतींनी दोषींची दयायाचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, दोषी विनय शर्मा याने आपले वकील ए. पी. सिंग यांच्यामार्फत नायब राज्यपाल अनिल बैजल यांना एक पत्र लिहिले असून त्यात फाशी रद्द करून या शिक्षेचे रुपांतरण जन्मठेपेत करावे, अशी विनंती केली आहे.