मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगेच्या खून खटल्यातून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी अचानक माघार घेतली आहे.
नितीन आगे यांचा खून झाल्यानंतर राज्यातील दलित संघटनांनी मोठे आंदोलन उभारले होते. परंतू अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु झाल्यानंतर साक्षीदार फितुर झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर, राज्य सरकारने औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते. परंतू या खटल्यातील सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतल्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रियेत दिरंगाई होण्याची शक्यता आहे. शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची 15 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती केली होती. मात्र, हा खटला सुनावनीत येताच शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतली आहे.