निंभोरासिम परिसरात अवैध वाळुची वाहतूक करणारे ट्रक्टर पडकले

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरासिम परिसरात अवैध वाळुची वाहतूक करणारे विना नंबर ट्रक्टर-ट्रॉली तहसीलदारांनी पडकले असून रावेर तहसिल कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.

या बाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील निंभोरासिम परीसरात अवैध वाळुची वाहतूक होत असल्याची माहिती रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना मिळाली. त्यानंतर नंतर स्वत: तहसीलदार निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, निंभोरासिम नजिक वाळुने भरलेले ट्रक्टर-ट्रॉली विना नंबर पकडले. ट्रक्टर पकडल्यानंतर स्पॉटवर सुमारे १०० लोकांची गर्दी जमली होती अखेर तहसीलदार यांनी निंभोरा पोलिसांना बोलावल्यानंतर अवैध वाळुने भरलेले ट्रक्टर-ट्रॉली बुधवारी सायंकाळी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.