ना डॉ राजेंद्र शिंगणे यांची औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलला भेट.

कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसिसवर चर्चा

बुलढाणा : प्रतिनिधी । कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनमंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे यांनी औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेऊन म्युकरमायकोसिस व तिसरी लाट यासंदर्भात चर्चा केली. 

 

यावेळी दाखल असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांची डॉक्टरांकडे आस्थेने विचारपूस केली.सध्या राज्यामध्ये दुसरी लाट असून नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे याचा सर्वात जास्त प्रभाव लहान मुलांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनानेदेखील त्यादृष्टीने तयारी सुरू केली असून शासकीय रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.

 

दुसरीकडे राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी औरंगाबाद येथे जातात. औरंगाबाद येथील रुग्णालयात कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी या हॉस्पिटलला भेट देऊन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ सूर्यवंशी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांशी चर्चा केली. प्रसिध्द साहित्यिक अजीम नवाज राही यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारणा करून त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन  चर्चा केली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.