जळगाव, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील वाल्मिक नगरमधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत ओपन जिमचे आज लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र, नागरिकांनी हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करत उद्घाटनासाठी आलेल्या आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन व इतर नगरसेवकांना विरोध केल्याने त्यांच्यावर ओपन जिमचे उद्घाटन न करताच परत फिरण्याची नामुष्की ओढवली.
वाल्मिक नगर येथील बागेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत ओपन जीमचा निधी ८.५० लाख इतका मंजूर झालेला आहे. त्यामध्ये बागेत मशिन बसवण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकाराची लेवलिंग केली गेली नाही, त्या साहित्यासाठी कोणत्याही प्रकाराची संरक्षण जाळी गेट बसवण्यात आलेले नाहीत. ब्लॉक, कस, डस टाकण्यात आलेला नाही. या निधीच्या अंतर्गत ज्या सोई सुविधा आहेत त्या गोष्टींची कोणतीही पुर्तता का करण्यात आलेली नाही असा प्रश्न महर्षी व्यास युवा बहुद्देशिय संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित केला. वाल्मिक नगरात बगीचा हा गेल्या कित्येक वर्षांपासुन असून या बागेला अद्याप कोणाचेही नांव देण्यात आलेले नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या बागेच्या सुशोभीकरणावर भर दिला गेला नाही. शहरातील इतर कॉलनीमध्ये सुशोभीकरण करण्यात आलेले आहे त्या त्याचप्रकारे आमच्या वार्डातील बगिच्याचे काम करण्यात येत नाही किंवा वार्डातील वाल्किम नगर भागामध्ये का कामे केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. वार्ड क्र.३ मधील वाल्मिक नगर हा भाग दलीत वस्ती असल्याकारणाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या भागामध्ये कोणत्याही प्रकाराचे रस्ते वगैरे झालेले नाही. ज्याप्रकारे इतर वार्डातील सर्वच नगरसेवक वार्डात लक्ष ठेवून असतात त्याचप्रकारे लक्ष ठेवले गेले पाहिजे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत जे काम करण्यात येत आहे ते चांगल्या दर्जाचे करण्यात यावे, सुविधा देण्यात याव्यात. या योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या संपुर्ण खर्चाच्या रकमेचा संपुर्ण तपशिल माहिती अधिकारात मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. हक्काचे नगरसेवक असून देखील विकास कामे होत नसल्याची नागरिकांनी खंत व्यक्त केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/696945448004360