नायगाव येथे जवानाचा सेवापूर्ती कार्यक्रम जल्लोषात

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथील जवान रफिक हुसेनं तडवी यांच्या १७ वर्ष सेवापूर्तीचा कार्यक्रम इन्सानियत ७८६ गृप माध्यमातून जल्लोषात साजरा करण्यात आला. 

 

रविवार दि. ०५ सप्टेंबर रोजी सैनिक जवान रफिक हुसेेनं तडवी हे १७ वर्ष देशसेवा करून मायदेशी परतले आहेत.  या सेवापूर्ती कार्यक्रमात सर्व इन्सानियत गृप सदस्य वरिष्ठ मार्गदर्शक आणि सर्व आदिवासी तडवी समाज बांधवानी आपला सहभाग नोंदविला.  गावातील दर्गा मस्जिद चौकात सैनिक जवान रफिक तडवी यांनी आपल्या देश रक्षणासाठी कार्यरत असतांना आलेल्या अनुभवांची माहीती व विचारांच्या माध्यमातुन मार्गदर्शनपर माहीती देतांना अत्यंत भाऊक झाले.  यावेळी समाज बांधवांशी व उपस्थित ग्रामस्थांशी बोलतांना सांगितले की,  तुम्ही एक पाऊल पुढे या मी तरुणांना फिजिकली ट्रेनिंग व्यायामासाठी सज्ज करतो आणि घराघरातून देश रक्षणासाठी जवान तयार करतो. इन्सानियत गृप सर्व सदस्य व गावकरी  तडवी समाजबांधव यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. आणि खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात सदरील सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठया जल्लोषात आनंदाने पार पाडला.  यावेळी बबलु इतबार तडवी , मुस्तफा अरमान तडवी, बाबु बलदार तडवी, सर्फराज मेम्बर , फिरोज कलींदर तडवी , लुकमान मेहबुब तडवी, जावेद अरमान तडवी, शाबीर मुबारक तडवी , नदीम कुर्बान तडवी , जहाबीर नामदार तडवी, सलीम शावखा तडवी, फकीरा टेलर , राजु बाबु तडवी, नजीर कबीर तडवी , कवी बिराज तडवी आदी समाज बांधव मोठया संख्येने या प्रसंगी उपस्थित होते .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!