नायगावला आढळला महिलेचा मृतदेह

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रात्री आठच्या सुमारास नायगाव येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आहे.

दरम्यान, या महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस तपासातून या बाबी लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाचा पंचनामा करून याची नोंद करण्यात आली होती. तर संबंधीत महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. नायगाव येथील नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: