नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील नाभिक समाज विकास मंडळ, जळगाव शहरतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे पद्मावती मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. 

 

प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाध्यक्ष बटीभाऊ नेरपगार, कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष संगिताताई गवळी, कारबाजारचे संचालक श्री.सोनगीरे, संचालक बापू सोनवणे, खोंडे ज्वेलर्स संचालक संतोष खोंडे, नारायण सोनवणे, राजकुमार गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या श्री संत सेना महाराज मंदिराविषयी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात येऊन, देणगीदारांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष जगदीश वाघ, शहराध्यक्ष भिकन बोरसे, रामभाऊ जगताप, कमलेश निकम, नाना बोरसे, आबा बोरसे, विकास फुलपगारे, विकास बोरसे, एकनाथ सोनवणे, पंकज पवार, बस्तीराम बोरसे, संदीप वसाने, बंटी ठाकरे, मोहन पवार, बापू सोनवणे, भगवान शिवरामे, हिरामण सोनवणे, तुळशीराम जगताप, राजू वाघ, मयुर सोनवणे, सुरेश सोनगिरे, रविंद्र महाले, युवराज बोरसे, सचिन सोनवणे, किशोर वाघ, उदय पवार, शैलेश वाघ, अश्विन मोरे, दिपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!