नाथाभाऊ मातब्बर नेते ; ते योग्य तो निर्णय घेतील (व्हिडिओ )

संजय सावंतांनी प्रश्न पत्रकारांवरच उलटवला

 

जळगाव : प्रतिनिधी । नाथाभाऊ राजकारणातील मातब्बर नेते आहेत , भविष्यातील वाटचालीचा निर्णय योग्य वाटेल तसा ते घेतील आणि तुम्हालाही सुगावा लागेलच , असे सांगत आज शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाथाभाऊंची चाचपणी करण्याचा पत्रकारांचा मुद्दा त्यांच्यावरच उलटवला .

शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी संजय सावंत २ दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आलेले आहेत . आज झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते . ते पुढे म्हणाले कि , नाथाभाऊंच्या मुद्द्याला अजून पूर्णविराम मिळालेला नाहीय . त्यांनीही तसे काही स्पष्ट संकेत अजून दिलेले नाहीत . मलासुद्धा माध्यमांच्या माध्यमातून असे काही कळलेले नाहीय भविष्यात ज्या गोष्टी घडतील त्या सर्वांना समजतीलच . भविष्यात काय करायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांपेक्षा नाथाभाऊंना चांगल्या पद्धतीचे माहिती आहे माझ्या वर तुमची बारीक नजर आहेच मी कुठे जातो कुणाला भेटतो हे तुम्हाला समजेलच असे सांगत सावंत यांनी खडसे यांच्यासाठी मातोश्रीवरून काही निरोप घेऊन आला आहेत का ? , या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!