जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास काका आणि पुतण्या हे दुचाकीने शेतात जात असताना काहीही कारण नसताना गावातील इतर १० ते १५ जणांच्या जमावाने शिवीगाळ करून बेदम मारहाा करून धारदार वस्तूने वार करून दोघांना जखमी केल्याची घटन घडली. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद येथील रहिवाशी लोकेश संतोष नारखेडे (वय-१८) रा. खालची आळी, नशिराबाद, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास लोकेश हा त्याचा काका रमेश खेमचंद नारखेडे यांच्यासोबत शेतात पाणी भरण्याच्या निमित्ताने दुचाकीने जात होते. त्यावेळी नशिराबाद येथील बसस्थानकाजवळील लहान बोगद्याजवळ काहीही कारण नसताना गावातील टवाळखोर १० ते १५ जणांनी लोकेशची दुचाकी अडवून त्याला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच यातील काहींनी धारदार वस्तूने दोघांवर वार केले. यात काका पुतणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान ही घटना ज्यावेळेस घडली, त्यावेळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील धाव घेतली होती, परंतु जमावाने देखील पोलिसांना धक्काबुक्की केल्याचे माहिती देखील समोर आली आहे. याबाबत अद्यापपर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही.