देवेंद्र मराठे व मुजीब पटेल यांचा पदग्रहण समारंभ (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर महानगर अध्यक्ष मुजीब पटेल यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात जिल्हा कॉंग्रेस भवन येथे पार पडला.

 

नवनिर्वाचित युवक काँग्रेस पदाधिकारी पदग्रहण व सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार हे होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, अॅड.अविनाश भालेराव , महानगराध्यक्ष श्याम तायडे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, विनोद कोळपकर, व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, डिजिटल मेंबरशिपचे महाराष्ट्राचे समन्वयक राहुल साळवे, माजी महानगर अध्यक्ष डॉ अर्जुन भंगाळे, अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे, रावेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, एरंडोल तालुका अध्यक्ष विजय महाजन, धरणगाव तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी, जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमजद पठाण , राहुल मोरे, सखाराम मोरे, अमळनेर युवक अध्यक्ष महेश पाटील, रावेर युवक अध्यक्ष फैजान शहा, जामनेर युवक अध्यक्ष धर्मराज पाटील, एरंडोल युवक अध्यक्ष इम्रान सय्यद, पाचोरा युवक अध्यक्ष शेख शकील आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव मूक्तर्दीर देशमुख, सरचिटणीस डॉ. शोएब पटेल व मयूर शेंगदाणे यांनी कामकाज पहिले. सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव मुक्तदीर बाबा देशमुख व आभार रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शहा यांनी मानले.

 

 

भाग १

भाग २

भाग ३

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: