नवदुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत शिरली कार; एकाचा मृत्यू

भोपाळ | नवदुर्गा विसर्जन सुरू असतांना एका माथेफिरूने भरधाव वेेगातील कार मिरवणुकीत घुसवल्याने एक जण ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरा ही घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या दुर्गा माते मिरवणुकीत कार घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर वीसहून अधिक जण जखमी झाले. कार अचानक मिरवणुकीत घुसल्याने हा भीषण अपघात घडला होता.

यानंतर आता मध्यप्रदेशातील भोपाळ शहरातही काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास असाच गंभीर प्रकार घडला आहे. येथील बाजारिया पोलीस स्टेशन परिसरातील एका माथेफिरू तरुणाने भरधाव वेगाने कार दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसवली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून गेला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!