नगरदेवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर

पाचोरा प्रतिनिधी । नगरदेवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड माजी आमदार दिलीप वाघ यांच्या आदेशाने व संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

माजी आमदार दिलीप वाघ , विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, बाजार समितीचे प्रशासक रणजित पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना  निवड पत्र देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

नगरदेवळा शहराध्यक्षपदी सुनिल तावडे, शहर कार्यध्यक्ष सचिन गढरी, आबा महाजन, रावसाहेब पाटील, नगरदेवळा शहर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील (वाघदेकर), शहर सचिव पदी आण्णा महाजन, शहर मुख्य संघटकपदी बालु पाटील, शहर चिटणीसपदी संदिप परदेशी, शहर सरचिटणीसपदी शरद गढरी, शहर प्रसिद्धी प्रमुखपदी दादामिया पिंजारी, शहर प्रवक्ता पदी उत्तम पाटील, ओ. बी. सी. सेलच्या नगरदेवळा शहराध्यक्ष पदी प्रकाश परदेशी ओ. बी. सी. सेलच्या शहरउपाध्यक्ष पदी अनिल पाटील, व सा. न्याय विभाग नगरदेवळा शहराध्यक्ष पदी सुरेश बागुल,अल्पसंख्याक विभाग शहर उपाध्यक्षपदी इब्राहिम पठाण  सर्वानुमते निवड करण्यात आली.

याप्रसंगी उपसरपंच विलास पाटील, मुन्नाकाका परदेशी, मोहन तावडे, राकेश थेपडे, विलास सोनवणे, अशोक सोंनी, कडू आबा पाटील, संजय पाटील, धनराज पाटील, अली रजा, अनुभाई शेख, योगेश महाजन, रज्जक शेख, सुरेश पहेलवान, ग्रा.प.सदस्य सुनील महाजन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पंकज गढरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे  तालुकाध्यक्षा अभिलाषा रोकडे, नाना भामरे, आकाश चौधरी, सचिन पाटील, शाहरूख मणियार, स्वीय सहाय्यक गोपी पाटील, त्रिभुवन व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!