भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील नगरदेवळा दरवाजाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार असे करावी ही मागणी दिनेश महाजन यांनी निवेदाच्या माध्यमातून यांनी केली आहे.
अखिल भारतीय सेनेचे युवा तालुका अध्यश दिनेश सतीश महाजन वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलेला आहे. यात म्हटले आहे की, भडगाव गावातील मेनरोड वरील नगरदेवळा दरवाजाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशदार असे करावे असे निवेदन ८ महिनेअगोदर भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले होते.
असे असतांनाही आजपर्यंत त्यासंदर्भात कोणतेही काम पुढे करण्यात आलेले नाही. यामुळे या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.