धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा ते परधाडे रेल्वेस्थानकादरम्यानची घटना; ओळख पटविण्याचे आवाहन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते परधाडे रेल्वेस्थानका दरम्यान धावत्या रेल्वेतून प्रवाशी खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदी करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे किलोमीटर खंबाक्रमांक ३७४/२४-२६ नजीक रेल्वे रुळाच्या बाजुला एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आढळून आला. याबाबत एका मालगाडीचे लोको पायलट रामजीर कटीहार यांनी रेल्वे रुळ तपासणीस याचे वॉकीटाकीवर संदेश दिल्यानंतर त्या रेल्वे कर्मचाऱ्याने सदरची बाब स्टेशन प्रबंधक यांना कळविली. दरम्यान स्टेशन प्रबंधक यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिल्यानंतर पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. खासगी रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अनोळखी इसमाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास व मयत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे काम पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content