धावत्या रेल्वेतून पडल्याने मुंबईतील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

माहेजी रेल्वे स्थानकाजवळील घटना; पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून पडल्याने मुंबई येथील चाळीस वर्षीय व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी माहेजी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खंबा क्रंमाक ३८६ /१ नजीक कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडल्याने उत्तम नरेन पॉल (वय – ४०) रा. नालासोपारा (मुंबई) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे.  या घटनेची माहिती माहेजी रेल्वे प्रबंधकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. मयत उत्तम पॉल यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करित आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.