धावत्या रेल्वेच्या धक्क्याने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागून रेल्वे विभागात कार्यरत कंट्रोलर वैभव आत्माराम लभाणे (३३) रा. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. सुरूवातीला त्यांची अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली.

store advt

परंतु अंगझडतीत मिळालेल्या आधार कार्डावरून भुसावळ तालुका पोलिसांनी त्यांची ओळख पटविली. भुसावळ वरणगाव दरम्यान फेकरी शिवारात लोहमार्गावर ही घटना घडली. खबर मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पाोलीस निरीक्षक रामकृष्णवकुंभार, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार अजय माळी, पाोलीस कॉन्सटेबल शिवाजी खंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहिकेतून वैभव यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला. मयताच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दुपारी नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वैभव हे अविवाहित असून पश्चात दोन भाऊ, आई वडील असा परिवार आहे. या प्रकरणीपोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!