धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी इसमाची आत्महत्या!

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव डाऊन रेल्वे लाईनवरील कि.मी. ३२५/२७ , ३२६/०१ दरम्यान गाडी क्र. ०२१३१ या धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी इसमाने (अंदाजे वय-४५ ते ५०) आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी सदर ठिकाण गाठून पंचणामा केला. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नसून मृताचा उजवा पाय हा जन्मताच लहान आहे. त्यामुळे तो अपंग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटावी यासाठी खालील नंबरवर मो. ९५२७९३१९२०, ०२५८९-२२३५८४ वर संपर्क करण्याचे रेल्वे पोलिसांनी आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नागेंश दंदी हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!