धार उपसरपंचांची सामाजिक बांधिलकी : अल्पसंख्याक मुस्लिम बांधवास आर्थिक मदत

अमळनेर प्रतिनिधी |  तालुक्यातील धार येथील अल्पसंख्याक मुस्लिम बांधवास  राज कंस्ट्रक्शनचे संचालक  येथील उपसरपंच शशिकांत माधव बोरसे यांनी अल्प मदत म्हणून पाच हजार ७८६  रूपयांचा धनादेश सुपूर्त केला.

 

अमळनेर तालुक्यातील धार येथील अल्पसंख्याक मुजावर मिरुवाह जाकीर हिच्या  विवाहाकरीता राज कंस्ट्रक्शनचे शशिकांत माधव बोरसे उपसरपंच धार यांच्यातर्फे राज कंस्ट्रक्शनच्या कंपनी खाते तसेच फंडातुन पाच हजार 786 रूपयांची अल्प मदत तिच्या बाबांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तसा धनादेश आज दिनांक ३ ऑक्टोबर रोजी तसेच मुजावर मिरुवाह जाकीर हिच्या विवाह प्रसंगी धार ता. अमळनेर येथील उपसरपंच यांच्या हस्ते देण्यात आला. ही अल्प मदत जरी असली तरी योग्य वेळेला अर्थात लग्न प्रसंगी मिळाल्याने मुजावर मिरुवाह जाकीर हीच्यासह बांधवानी शशिकांत बोरसे उपसरपंच धार यांचे आभार मानून कौतुक केले.शशिकांत बोरसे यांनी या आधी देखील गावात संकट समयी अनेकांना आर्थिक मदत केली आहे.यावेळी शौकत मुजावर राजेंद्र तुळशीराम पाटील मा.उपसरपंच धार सुनिल नामदेव पाटील जगतराव साहेबराव पाटील इब्राहिम खान पठाण राजीक मुजावर अजित शहा मुख्तार दादा लतीफ दादा  उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!