धानवड येथील तरूणीची विषारी औषध घेवून आत्महत्या

एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धानवड येथील तरूणीची विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

दुर्गा पुरूषोत्तम वाघ (वय-२३) रा. धानवड ता. जि.जळगाव असे मृत तरूणीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गा वाघ ही तरूणी आपल्या कुटुंबियासह जळगाव तालुक्यातील धानवड येथे वास्तव्याला होती.  घरी कुणीही नसतांना तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले. दरम्यान, हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.