जळगाव, प्रतिनिधी । शिवाजी नगर येथे जिल्हा निवडणूक आयोगातर्फे आणि धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी शिबीर घेण्यात येणार आहे.
नवीन मतदार शिबीर हे २८ नोव्हेंबर २०२० पासून ते १ जानेवारी २०२१ या दरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व त्यांच्या मार्गदर्शनानूसार प्रभाग क्रमांक २ मधील शिवाजी नगर भागापासून नवीन मतदार नोंदणी तसेच मयत मतदारांचे यादीतील नावे कमी करणे आणि मतदार यादीतील पत्ता बदल करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. तरीही प्रभागातील नागरिकांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधून सदर सेवेचा फायदा घ्यावा जेणेकरून कोणीही मतदार आपल्या अमूल्य मतदानाच्या अधिकारापासून वंचित रहणार नाही तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी विनायक पाटील – 8888227775, निशांत पाटील – 8087152595 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले आहे
.