धरणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण योग्य पद्धतीने करण्याची मागणी

शेअर करा !


धरणगाव (प्रतिनिधी)
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण अधिक योग्य पद्धतीने केले जावे, यासाठी आज गौतम नगरमधील समाज बांधवांनी माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांच्या नेतृत्वात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना निवेदन दिले.

store advt

 

शहरातील येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. परंतू पुतळ्याच्या भवती बांधकाम होत असलेल्या वर्तुळाकार कंपाऊंड थोडे मोठे करावे. तसेच कंपाऊंडची जाळी लोखंडी न वापरता, स्टीलची वापरण्यात यावी. यासह पुतळ्यावर हार टाकण्यासाठी दोन्ही बाजूने शिडी बसविण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी दीपक वाघामारे, जितू शिरसाठ, मयूर भामरे, जितेंद्र वानखेडे, शुभम सोनवणे, दिपक सोनवणे, विवेक बाविस्कर, किरण सोनवणे, अजय मोरे, संतोष आखाडे, रवींद्र मोरे आदीं समाजबांधव उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!