धरणगाव तालुक्यात १८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

शेअर करा !

धरणगाव, प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून आज नव्याने १८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. बाभळे येथे ५ तर साळावा येथील २ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.

धरणगाव तालुक्यात आज नव्याने १८ रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्या पार केला असून एकुण ५२४ रूग्ण झाले आहे. दरम्यान आज आढळून आलेले बाभळे ५, साळावा २,  भावरखेडा १, एकलग्न १, पिंपळे सिम १, बांभोरी प्रचा १, सतखेडा १, पाळधी बृ. १, पाळधी ख्रुर्द १, कल्याण होळ १, धरणगाव येथे बालाजी गल्ली, लहान माळी वाडा प्रत्येकी १, जळगाव १ असे एकुण १८ रूग्ण आढळले. एकुण ५२४ रूग्णांपैकी २९ मयत झालेत. तर ३९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ९६ रूग्ण उपचार घेत आहे. या वृत्ताला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57
आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!