धरणगाव तालुक्यात १७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

शेअर करा !

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यातून १७ रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण १७ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात वराड-१,बोरगाव-५,पथराड बुद्रुक-२,पाळधी बुद्रुक-१,साळवा-२, धरणगाव-१, जैन गल्ली-१, हेडगेवार नगर-१ असे एकुण १७ रूग्ण आढळून आले आहे. धरणगाव तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ६१६ झाली असून यापैकी ३३ जणांचा मृत्यू तर ४५६ जण बरे होऊन घरी पाठविले आहे. तर उर्वरित १२७ जण उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!