धरणगाव तालुक्यात १० वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग

धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातील एका भागात राहणारी १० वर्षीय चिमुकलीला पाणी भरण्याच्या बहाणा करून घरात बोलवून तिचे तोंड दाबून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बांभोरी गावातील एका भागात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० मे रोजी दुपारी साडेतीन वर्षाच्या सुमारास गावात राहणारा कडू उर्फ देविदास मधुकर नन्नवरे याने पीडित मुलीला पाणी भरण्याचा बहाणा करून घरात बोलावले, तसेच तिचे तोंड दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीचे वडील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपीकडू उर्फ देविदास मधुकर नन्नवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content