धरणगावात आज दोन नवीन कोरोना बाधीत !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात आज नवीन दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव तालुक्यात आज दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये दोन नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. हे दोघं रूग्ण शहरातील परिहार नगरातील आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. संबंधीत रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या दोन रूग्णांमुळे तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची संख्या १३२ इतकी झाली आहे. तर ११ जण मयत झाले आहेत.

Protected Content