धनाजी नाना महाविद्यालयातील मनिषचे भारतोलन स्पर्धेत यश

मनिष महाजन यांची भारतोलन स्पर्धेत रौप्य व कांस्यपदकाची कामगिरी

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात व्दितीय वर्ष एम. एस्सी. वर्गात शिकत असलेला मनिष कैलास महाजन याने नुकत्याच रावेर येथे संपन्न झालेल्या खुल्या राज्यस्तरीय भारतोलन स्पर्धेत ९६ किलो वजन गटात खेळत स्नॅच प्रकारात १२८ किलो व क्लिन अँड जर्क प्रकारात १५७ किलो असे एकूण २८५ किलो वजन ऊचलून गटात कांस्यपदक प्राप्त केले.

मनिष महाजन याने महाराष्ट्र शासनाव्दारा आयोजित पुणे येथे संपन्न झालेल्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय भारतोलन स्पर्धेत 96 किलो वजन गटात खेळत स्नॅच प्रकारात 126 किलो व क्लिन अँड जर्क प्रकारात 154 किलो असे एकूण 280 किलो वजन ऊचलून गटात रौप्यपदक प्राप्त केले.

मनिष महाजन यांच्या या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरीसर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी खेळाडूचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content