धनगर समाज सेवा संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी श्रीराम काटे

शेंदुर्णी, ता. जामनेर, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य धनगर समाज सेवा संस्थेच्या शेंदुर्णी शहर कार्याध्यक्ष पदी नुकतीच श्रीराम काशिनाथ काटे (धनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जामनेर येथे नुकतीच धनगर समाज सेवा संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील तसेच जामनेर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान संस्थेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले यांच्या हस्ते श्रीराम काशिनाथ काटे यांना नियुक्त पत्र देण्यात आले. येणाऱ्या काळात संस्थे मार्फत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची यशस्वी अंमलबजावणी करणे व समाजातील सर्व घटांपर्यंत संस्थेचे कार्य पोहचवणे ही कामगिरी करावी लागणार आहे. श्रीराम काटे हे शेंदुर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असून धनगर समाजातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या निवडीबद्दल जामनेर तालुका आत्मा समिती सदस्य आनंदा धनगर, राजेंद्र सपकाळ, अमृत भंवरे, आनंदा सपकाळ ,गरुड पतसंस्था, उपाध्यक्ष प्रदीप धनगर आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!