धक्कादायक : धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर रात्री अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सहा वर्षांपुर्वी अल्पवयीन मुलीच्या वडीलांचे निधन झाले आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्यांच्या गल्लीतील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला. दुसरीकडे रात्री १० वाजता अल्पवयीन जागेवर नसल्याचे आई चितेंत होती. त्यांच्यासह नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेतला मिळून आली नाही. त्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजता अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत धरणगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी ७ डिसेंबर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!