रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरूणीने शहरानजीकच्या एका शेतातील विहीरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीला आली आहे.
रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरूणी शितल मुकेश वाघोदे (वय-१९) ही तरूणी बुधवारी २८ जून रोजी कॉलेजला रावेरला जात असल्याचे सांगूल घरातून गेली होती. त्यानंतर ती घरी न असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीच काम करणाऱ्या महिलांना त्याच शेतात असलेल्या विहीरीजवळ शाळेची बॅग व चप्पल आढळली बॅग आढहून आली. तिच्या बॅगेत तपासणी केली असता ती वडगावची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून विहिरीत शोध घेतला. परंतू ती मिळून आली नाही. आज गुरूवारी २९ जून रोजी सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह पाण्यात हाती आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.