धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर शेतात अत्याचार !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवर शेतात नेवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाना गोरख अहिरे रा. तळवाडे ता. नंदगाव जिल्हा. नाशिक यासह दोन अनोळखी व्यक्ती यांनी मुलीला फोन करून मंदीराजवळ बोलावून घेतले. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून औरंगाबाद रोडवरील एका शेतात नेले. तिथे तिच्यावर नाना अहिरे याने बळजबरी हात पकडून अत्याचार केला. तसेच कुणाला काही सांगितले तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडीत मुलीने नातेवाईकांसह चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नाना अहिरे आणि सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.

Protected Content