दोन हजाराची नोट पुन्हा आणावी लागणार : ‘या’ तज्ज्ञाने केला दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दोन हजारांच्या नोटेवरून मोठी चर्चा सुरू असतांनाच एका अर्थतज्ज्ञाने ही नोट पुन्हा वापरात आणावी लागेल असा दावा केला आहे.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं   काल मोठी घोषणा करत वितरणातून २,००० दोन हजार रुपयांची नोट मागे घेण्याची घोषणा केली.  याबाबत अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटलं की, २००० रुपयांची नोट मागे घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेचा सर्व भार आता केवळ ५०० रुपयांच्या नोटांवर पडेल. याचा साधा अर्थ असा की ५०० रुपयाच्या नोटा हेच फक्त चलन भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात चालणार नाही. त्यामुळं आरबीआयला त्वरीत १००० रुपयांची नोट पुन्हा चलनात आणावी लागेल. जो निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. तो दिवाळखोरपणाचा निर्णय होता, तो सिद्ध झाल्यानं आता सरकारला ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणाव्या लागतील असे ते म्हणाले.

 

दरम्यान, डॉ. मुणगेकरांनी या निर्णयावरून टिका देखील केली. ते म्हणाले की, खरंतर सरकारनं आणि पंतप्रधानांनी या निर्णयासाठी देशाची माफी मागायला पाहिजे होती. पण माफी मागण्याऐवजी घेतलेला चुकीचा निर्णय दुरुस्त करण्यासाठी आता बरोबर उलटा निर्णय सरकारला घ्यावा लागतो ही सरकारची नामुष्की आहे. अशा नामुष्कीमध्ये आरबीआयनं कधीही सामिल होता कामा नये.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content