देशात गेल्या २४ तासांत आढळले ३२ हजार ६९५ नवीन रुग्ण !

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३२ हजार ६९५ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे.

store advt

 

भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २,७५,६४० वर पोहोचली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर देशभरात गेल्या २४ तासांत आणखी २० हजार ५७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत सहा लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख ३१ हजार १४६ रुग्ण उपचाराधीन आहेत. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत २५ हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. आठ दिवसांत दोन लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!