देशात गेल्या चोवीस तासांत तब्बल ५७,११७ नवे कोरोनाबाधित

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या चोवीस तासांत तब्बल ५७,११७ नवे रुग्ण आढळले, तर ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

store advt

 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली की, देशातील करोना रुग्णसंख्या आता १६ लाख ९५ हजार ९८८ वर पोहोचली असून एकूण ३६,५११ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांमध्ये ३६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले असून एकूण करोनामुक्त रुग्णांचा आकडा १० लाख ९४ हजार ३७४ वर पोहोचला आहे. दुसरीकडे राज्यात महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ९,६०१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४,३१,७१९ एवढी झाली आहे. यापैकी १,४९,२१४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर आजपर्यंत एकूण २,६६,८८३ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!