देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करा (व्हिडिओ)

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देवून करण्यात आली.

 

निवेदनाचा आशय असा की, गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक हादरता वाढत आहे. हिंदूवर योजनापूर्वक पद्धतशीर हल्ले होत आहेत. या वर्ष प्रतिपदा आणि प्रभु श्री रामाच्या प्रकट दिनानिमित्त श्री राम नवमीला आयोजित देशभरातील मिरवणुकांवर दाइफेक आणि हल्ले केले गेले. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला आणि देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हिंदू समाजाने धीराने व समजूतदारपणाने वर्तन केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. त्यानंतर काही ठिकाणी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवरही दगडफेक झाली. हिंदू समाजाला आपल्या देशात आपल्या देवतांची मिरवणूक काढता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिजाबच्या वादातूनही कर्नाटकात बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळीही अनेक ठिकाणी हिंदूवर हल्ले झाले होते. नुकतेच भगिनी नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून गेल्या दोन शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मशिदीमधून हल्ले करण्यात आले. हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. सरकारी मालमता आणि मंदिरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिस दलांवरही हल्ले झाले, अनेकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी विहिप प्रांत मंत्री शेगेश्वर गर्ग, ललित चौधरी, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, वि. ही. प. जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, बजरंग दल विभाग संयोजक राजेंद्र नन्नवरे, धर्मप्रसार प्रांत उपाध्यक्ष धनंजय तिवारी, वि. ही. प. महानगर मंत्री मनोज बाविस्कर, बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील आदी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!