देवळाली ते दानापुर दरम्यान धावणार किसान विशेष पार्सल गाड़ी

भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेलवे प्रशासनद्वारा शेतकरी लोकासाठी त्यांचा माल बुक करण्यासाठी देवलाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी दि. ७ ऑगस्टपासून समयसारणीनुसार चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या किसान विशेष पार्सल गाडीमध्ये फळे , भाजीपाला आणि इतर नाशवंत माल बुक करू शकता येणार आहे. हि गाडी हप्ता मधून १ दिवस चालवली जाणार आहे. हि गाडी नाशिक , मनमाड , जळगाव , भुसावळ , बुऱ्हाणपूर , खंडवा , इटारसी, जबलपूर , सतना , कटनी , माणिकपूर , चिवकी , वाराणसी , पंडित दिन दयाळ उपाध्याय नगर , आणि बक्सर या ठिकाणी थांबेल . पार्टी द्वारा अन्य कोणत्या मध्यवर्ती स्टेशनवर थांब्याची मागणी असल्यास अतिरिक्त थांबा दिला जाऊ शकतो असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.