दुचाकी चोरीप्रकरणी विधीसंघर्षीत बालकासह तिघांना अटक

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या पारोळा तालूक्यात खेडेगावात विक्रीचा सपाटा काही चोरट्यांनी लावला होता. अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हेशाखेने शोध घेतला असता एक अल्पवयीन संशयीतासह त्याचे दोन साथीदारांना पोलिसांनी अटक करुन तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

नाशिक जिल्‍ह्‍यातून मोटारसायकली चोरुन त्या पारोळा तालूक्यात मिळेल त्या किंमतीत विक्री करण्याचाा सपाटा चोरट्यांनी लावला होता. चोरुन आणलेल्या दुचाकी पारेाळ्यातील गॅरेज चालकाला विक्रीसाठी देण्यात येत होत्या. निरीक्षक बापू रेाहोम यांच्या पथकातील शरद भालेराव, नारायण पाटील जितेंद्र पाटील, रामकृष्ण पाटील अशांच्या पथकाने गुप्त माहितीचा शोध घेत गॅरेज चालक रविंद्र शिवदास पाटील (वय-२४ रा.टेहू) याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या ताब्यातून एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. त्याची चौकशी केल्यावर त्याने दोन साथीदारांची नावे सांगीतली. गोपाल अरुण महाजन (वय-२३,रा.पारेाळा शिवकॉलनी) आणि त्याचा एक सतरा वर्षीय साथीदार अशांच्या नावाचा खुलासा झाल्यावर देाघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी दोन चोरीच्या मोटारसायकली पथकाला काढून दिल्या. अटकेतील संशयीतांवर पारोळासह नाशिक जिल्‍ह्‍यात गुन्हे दाखल असून त्या-त्या पेालिस ठाण्याचे पथक संशयीतांचा शोध घेत होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!