दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । जामनेर पोलिस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत दुचाकी चोरट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

store advt

कासीम शेख रसुल (रा.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीदेखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. जामनेर पोलिस ठाण्यात भाग 5 गुरनं.253 /2019, भादंवि 379 अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील दुचाकी संशयीत आरोपी कासीमकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात सहा.फौजदार अशोक महाजन, राजेंद्र पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक प्रवीण हिवराळे, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल मनोज दुसाने, कॉन्स्टेबल अरुण राजपूत, कॉन्स्टेबल रणजीत जाधव आदींनी आरोपीला अटक केली. आरोपीला जामनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!