यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळा घाटात पहिलवानचे ढाबाजवळ दुचाकी घसरून एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र सुभराम बारेला (वय २०, रा जामुनझ-या ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावलकडून भुसावळकडे जितेंद्र बारेला आणि राजू रुपसिंग पावरा (वय २०.रा. जमूनझिऱ्या) हे जात असताना अंजाळा घाटात त्यांची हिरो पॅशन दुचाकी क्र. एमएच १९ ईडी ५२८५ ने जात होते. त्यावेळी दुचाकी घसरल्याने दोघी खाली पडले. त्यात जितेंद्र सुभराम बारेला हा मयत झाला. तर राजू पावरा जखमी झाला. राजू पावरा यांचे फिर्यादीवरून जितेंद्र याने त्याचे मरणास व राजू पावरा याचे झालेल्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनिरी. सुनिल मोरे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.