दुचाकीस्वारास अज्ञात कारचालकाने दिली धडक : रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

 

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय नोकरदार पंकज गोपाल देशमुख (वय ३३ रा. विमल कुंज, दत्त कॉलनी जळगाव ) हे त्यांच्या दुचाकीवरून गुरुवार २२ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता रॉयल पॅलेससमोरुन जात असतांना त्यांना चारचाकीच्या धडक दिल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी आज शनिवारी अज्ञात कारचालकाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दि. २२ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पंकज गोपाल देशमुख हे ड्युटी आटोपून घरीत जात होते. यादरम्यान हॉटेल रॉयल पॅलेससमोर एम.एच.१९ सी.एफ २९२८ या क्रमांकाच्या चालकाने टर्न घेतांना देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली. यात देशमुख याच्या उजव्या दंडाला व कमरेला जबर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी आज शनिवारी पंकज देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात एम.एच.१९ सी.एफ २९२८ या क्रमाकांच्या चारचाकीवरुन अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील पाटील हे करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.