दुचाकीचा कट लागल्याने तरूणावर कुऱ्हाडीने वार; एकाला अटक

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागल्याने तरूणावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भाटखेडा येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली. आज न्यायालयाज हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भाटखेडा येथील रहिवाशी गोकुळ भास्कर गांगवे (वय-२५) याने दुचाकीने कट मारल्याचा राग येवून संशयित आरोपी अशोक तुळशीराम चौधरी (वय-५२) रा. भाटखेडा ता. रावेर याने शिवीगाळ करून ‘साल्यांनो माझे नांदी लागले तर तुम्हाला मी जिवंत ठेवणार नाही’ असे बोलून माझ्या नांदी लागले तर तुम्हाला मी जिवंत ठेवणार नाही असा दम देवून गोकुळ गांगवे हा तरूण बाहेर शौचास गेल्याचे पाहून संशयित आरोपी अशोक चौधरी याने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जमखी तरूणाच्या वडिल भास्कर रघुनाथ गांगवे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अशोक चौधरी याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपी अशोक चौधरी याला शुक्रवारी उशीरा अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय मनोज वाघमारे करीत आहे

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!