दारूबद्दल बोलली म्हणून नवऱ्याने बायकोच्या हातावर कुऱ्हाडीने मारले

जळगाव प्रतिनिधी । दारू पिणे सोडत का नाही असे म्हणताच पत्नीच्या हातावर पतीने कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भादली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रूक येथे दारु पिणे सोडत का नाही, असे पत्नी बोलली असता, त्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या हातावर कुर्‍हाड मारण्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी रात्री साडेबारा वाजता विवाहितेच्या तक्रारीवरुन तिचे पती सतीष अरुण सोनवणे यांच्या विरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पती सतीष अरुण सोनवणे रा. चोरगाव  ता. धरणगाव असे पतीचे नाव आहे. विद्या सतीष सोनवणे ह्या पतीसह धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे राहतात. काही दिवसांपासून त्या माहेरी भादली बुद्रूक येथे वडीलांकडे राहत आहेत. गुरूवारी ३ जून रेाजी सायंकाळी विद्या यांचे त्यांचे पती सतीष अरुण सोनवणे हे भादली बुद्रूक येथे आले. घराबाहेरुन त्यांनी पत्नी विद्या हिस बोलावले. तसेच आता मी दारु पिणार नाही, म्हणून चोरगाव येथे माझ्या सोबत चल असे सांगितले. त्यावर विद्या यांनी पती सतीष यास तुम्ही नेहमीच असे सांगतात व दारु पिणे सोडत नाही सांगितले. याचा राग आल्याने सतीष सोनवणे याने पत्नी विद्या हिच्या डाव्या हातावर कुर्‍हाड मारली. यात विद्या जखमी झाल्या. याप्रकरणी विद्या सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन काल शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता पती सतीष अरुण सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम जगन्नाथ तळेले हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.