दारूच्या नशेत भावावर कोयत्याने वार

पहुर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे दारूच्या नशेत कारण नसताना भावाच्या डोक्यात कोयता मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांतीलाल झीपा नाईक (वय-४५,  रा. मालखेडा ता. जामनेर) असे जखमी झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे कांतीलाल नाईक हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २४ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कांतीलाल नाईक हे त्यांच्या घरी बसलेले असताना त्यांचा भाऊ अरुण झीपा नाईक हा दारूच्या नशेत येऊन काही कारण नसताना भावाशी वाद घातला. नंतर अरुण नाईक याने जवळ असलेल्या कोयत्याने भावाच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. यानंतर जखमी झालेल्या कांतीलाल नाईक यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवार २५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कांतीलाल नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अरुण झिपा नाईक रा.मालखेडा ता.मनेर यांच्या विरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.

Protected Content