दारूच्या नशेत तिघांनी केला ‘रमा’चा गेम; तिघे मारेकरी पोलीसांच्या ताब्यात

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीघे कैद; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहूनगर येथे रेल्वे पटरी जवळ तरूणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० जुलै रेाजी दुपारी घडली. नेहमी शिवीगाळ करत मारहाण करायचा व पैसे हिसकावून घ्यायचा, या कारणावरून तिघांनी रागातून चाकूने वार करून तरुणाचा खून केला आहे. घटनेनंतर काही तासातच शहर पोलिसांनी मारेकरी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

 

पैसे हिसकावण्याच्या रागातून झाली बाचाबाची

जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथे भोंग्याजवळ रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-25)  हा कुटुंबासह वास्तव्यास होता. हमाली काम करून तो उदरनिर्वाह भागवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम शहा हा बुधवारी २० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास काही त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील रेल्वे रुळाजवळ झाडाखाली मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले होते. यावेळी रहीम शहा याचा इतरांसोबत वाद झाला. या वादातून त्याच्या सोबतच्या तिघांनी चाकूने रहीम शहा यांच्या छातीवर पोटावर वार करत त्याचा खून केला. खुन केल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

 

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. व पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मयताच्या पश्चात पत्नी फरिनबी, आई रमजाबी मोहम्मद शहा, वडील, तीन मुली असा परिवार आहे. रहीम हा एकुलता एक होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

 

तिनही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

शहर पोलिसांनी काही तासातच तपास चक्र फिरवून रहीम शहा याचा खून करणाऱ्या तिघांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतले. पवन किसन लाडे उर्फ देवा (वय १९), मनोज जलाल गायकवाड (वय ४२) व विलास तुकाराम निकम (वय ३४), तिन्ही रा.गेंदालाल) असे तिघांची नावे आहेत. हे तिघेही संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत रहीम व मारेकरी तिघेही मित्र आहेत. एकाच परिसरात राहतात.  रहीम हा शिवीगाळ करून वाद घालत तिघांना मारहाण करायचा व त्यांच्याकडील पैसे हिसकावून घ्यायचा. यामुळे तिघांमध्ये रहीम विषयी राग होता याच रागातून तिघांनी आज कटकारस्थान असून रहीमला सोबत घेत मद्य प्राशन केले व त्यानंतर त्याचा खुन केल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.