दारुऐवजी सॅनिटायजर प्यायल्याने एकाचा मृत्यू !

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात दारुऐवजी सॅनिटायजर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गौतम गोस्वामी (वय ४५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

store advt

 

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गंगाबाई घाट परिसरात राहणारे महापालिकेत सफाई कर्मचारी गौतम गोस्वामी यांना दारूचे व्यसन होते. सध्या दारुची दुकानं बंद असल्यानं तो सॅनिटाईजर प्यायचा. यामुळे आठ दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!