दहिगाव येथे पुन्हा बेकायदेशीर प्लॉटची विक्री : ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगावच्या आबा नगरातील गावठाण विस्तारिकरण भुखंडच्या प्लाटींची पुन्हा बेकायदेशीर खरेदी विक्री सुरू झाली असुन यावर कार्यवाही करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

या संदर्भातील अधिक माहिती अशी की दहिगाव येथे आबा नगरातील ३० ते ३५ वर्षापासून चा गावठाण विस्तारीकरणातील नऊ फूट रुंदीचा रस्ता येथील एक प्लॉट खरेदी करणार्‍याने अडवून टाकला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना ये-जा करण्याचा मार्ग राहिलेला नाही. याबाबत पारिसरात राहणार्‍या रहिवाशांनी ग्रामपंचायत कडे तक्रार ही केलेली आहे.

 

१९९७ व ९८ या वर्षात येथे गावठाण विस्तारीकरणात सुमारे ७५ प्लॉट टाकण्यात आलेले आहेत. या प्लॉट ची सन २०१५-१६ मध्ये चौकशी करून या ठिकाणी प्लॉटधारकांनी गैरवापर करणार्‍यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून, नजराणा म्हणुन आर्थिक दंंडवसुल केला होता.  तरीदेखील असे असतांना यातीलच कारवाई झालेल्या मधील काही लोकांनी पुन्हा या जागांचा खरेदी विक्रीचा व्यवहार केल्याचे बोलले जात आहे.

 

हा संपूर्ण बेकायदेशीर करण्यात आलेला व्यवहार कोणत्या पद्धतीने व कसा करण्यात आलेला आहे याबाबतची ही वरिष्ठांच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही रहिवासी करीत आहेत. शासनाने वितरित केलेल्या या गावठाण प्लॉट विक्री करता येत नाहीत असा शासनाचा नियम आहे. मात्र असे असतांना देखील नियमाचे उल्लंघन करून संबंधित अधिकार्‍यांनी प्लॉट्स खरेदी-विक्रीचे परवानगी कशी व कुणी दिली हा प्रश्न मात्र ग्रामस्यांमध्ये पडता आहे. गावातील काही धनदांडगे लोक धनशक्तीचा उपयोग करून गोरगरीब लोकांची पिळवणूक करीत असल्याचे यावरून दिसुन येत आहे. तरी शासनाच्या पद्धतीने सदरची जागा मोजून वितरित कराव्यात आणि रहिवाशांना रस्त्यासाठी होणारी मोठी गैरसोय दुर करावी अशी मागणी मात्र त्रस्त रहिवासी व महिला करीत आहेत.

Protected Content